संवेदना हरवलेला दाम..ले
मराठी नाट्यसृष्टीतील अग्रगण्य नाव म्हणजे प्रशांत दामले. मराठी नाट्यरसिक त्यांचा मनापासून आदर करीत होते. खूप मेहनती नट म्हणून त्यांचे कौतुकही होत असे. प्रशांत दामले यांच्या अभिनय प्रवासाची आणि रंगभूमीवरील यशाची माहिती सर्वांनाच आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे त्यांनी जवळपास 12,500 प्रयोग केले आहेत. 27 वेगवेगळी नाटके आणि 37 चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.
परंतु आजकाल प्रशांत दामले आपल्या क्षेत्राबाहेरील विषयांवर बोलू लागले आहेत. नुकतीच पत्रकार राजीव खांडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय युवकांच्या अर्थात Gen Z च्या आंदोलनावर भाष्य केले. बोलताना ते म्हणाले की, ज्यांना NEET चा फुलफॉर्मही माहिती नाही असे लोक देखील आंदोलनात भाग घेतात.
NEET म्हणजे National Eligibility cum Entrance Test. ही परीक्षा देण्यासाठी मुलं-मुली किती मेहनत घेतात हे आपण पाहतो. पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द होते, तेव्हा विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरते. नैसर्गिक आहे की ते चिडतील.
ज्यांची मुलं आंदोलनात सहभागी झाली होती, त्यांचे आई-वडील घरी स्वस्थ बसतील का? ज्यांचे पालक अनपढ आहेत त्यांना कदाचित NEET ठीक वाटत नसेल, परंतु त्यांना त्यांच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य त्यांच्या स्वप्नात दिसत आहे.
दामले च्या विधानावर उपस्थित पत्रकार हसले. पण या हसण्यातून त्यांची संवेदनशून्यता दिसून आली. NEET चा फुलफॉर्म माहिती असणाऱ्यांनी आंदोलनात भाग घ्यावा असे म्हणणे म्हणजे, बलात्कार झालेल्या पीडितेसाठी न्याय मागताना अनुभवी लोकच आंदोलनात हवेत, असे म्हणण्यासारखे आहे.
आपण एका विशिष्ट दिशेने चाललो आहोत. त्या दिशेला खूप काही साध्य करता येत असताना, आपले क्षेत्र नसताना त्यात डोकावण्यात काही अर्थ नाही.
दामले, तुम्ही चुकलात. तुमच्या या वक्तव्यामुळे NEET मुळे ज्या 22 मुलांनी आत्महत्या केली, त्या पालकांच्या मनातून तुम्ही उतरला आहात.
सुख म्हणजे काय असतं, हेच गाणे तुम्ही जिथे जाल तिथे गाता. लोक देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. पण त्या सुखाचा खरा अर्थ तुम्हाला कळला नाही, असे वाटते.
मागची पिढी फारशी शिकलेली नाही. त्यांना शिकता आले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवले. पण आज शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्याच मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जंतर-मंतरवर फक्त विद्यार्थीच नव्हते, तर पालक देखील आवर्जून हजर होते. त्या 22 मुलांसारखे आपल्या मुलांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते.
या आंदोलनात फारसे अभिनेते सामील झाले नाहीत. ज्यांना पुरस्कार हवे आहेत किंवा महाराष्ट्र भूषण किताब मिळवायचा आहे, ते असे विषय टाळतात. दामले देखील त्यातील एक..
साखर खालेला माणूस म्हणजे
प्रशांत दामले हे नेहमी गोड बोलणारे कलाकार आहेत. पण यावेळी ते युवकांविषयी कडू बोलून गेले. कदाचित त्यांची संवेदना हरवली आहे, असेच वाटते.
- अशोक भेके
घोडपदेव समूह
टिप्पण्या