*प्रवीण खामकर आणि सामाजिक उपक्रम*

            जनसेवा करीत त्याचे पुष्पहार करून समाजाच्या चरणी अर्पण करणारा एक निस्वार्थी कार्यकर्ता, ज्यांच्याबद्दल जनसामान्यांच्या मनात आदराचा, आपुलकीचा जिव्हाळा भरभरून वाहतो, त्या समाजसेवेला वाहून घेतलेल्या *श्री प्रवीण खामकर* यांच्याविषयी कितीही लिहिले तरी कमीच म्हटले जाईल. बहुतांशी लोक घोडपदेव समूहावर नितांत प्रेम करतात त्यांनी सुचविले प्रवीण खामकर यांच्यावर लिहा. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे भायखळा विधानसभा तालुकाध्यक्ष असणाऱ्या *श्री प्रवीण खामकर* यांच्याविषयी त्यांच्या विरीधी पक्षातील कार्यकर्त्यांनी सूचना करावी म्हणजे आमच्या घोडपदेव प्रभागातील राजकीय वातावरण किती खेळीमेळीचे आहे, हे कळून चुकले असेलच. खरं तर प्रवीण खामकर नावाप्रमाणे सामाजिक कार्यात सतत प्रवीण आहे. त्यांच्याशी अनेकांचे असलेले ऋणानुबंध ते केवळ राजकीय पक्षाशी नसून समाजातील कनिष्ठ वर्गाशी देखील आहेत. समाजासाठी आपले जीवन व्यतीत करताना व्यस्त असणारे आपल्या कुटुंबाला वेळ देताना कंजुषी करतात. तसा आमचा हा मित्र, समाजाला जेव्हा भरभरून देत असतो तेव्हा कुटुंबाला कमी वेळ देण्यात त्यांचा हात आखडता असतो. प्रवीण खामकर म्हणजे सदा हसरी मूर्ती, सतविचारी, सेवाभावी. किरकोळ शरीरयष्टी पण परोपकारी.सढळ हाताने मदत करणारी. परोपकार हा त्यांच्या वृत्तीचा स्थायीभाव होय. अनेक अडचणीना धीराने आणि आनंदाने तोंड देत समाजाच्या सुखदु:खात सदैव सामील असणारे श्री खामकर यांना थोरल्या भावाची साथ आणि सौभाग्यवतीचे पाठबळ लाभत आले आहे.  

            आपल्या अंत:करणात एक आदर्श व्यक्ती असते. आमच्या अंत:करणात  प्रवीण खामकर यांच्या मातोश्रीने घर केलेले आहे. त्यांच्या लाघवी बोलण्या वागण्यातून मुलांवर केलेले संस्कार त्यांची थोरवी शब्दात काय वर्णावी. मनाला सात्विक आनंद मिळविण्यासाठी प्रवीण खामकर गेली पंचवीस वर्षे ( एक तप नव्हे दोन तपाहुनी अधिक ) घोडपदेव नाक्यावर दीपावली सणाच्या निमित्ताने अगदी स्वस्त धान्य विक्री करीत असतात. गेली २५ वर्षे...   लक्षात घ्या. एखाद्या माणसाने केलेला संकल्प बिनबोभाट २५ वर्षे राबविणे म्हणजे त्याच्या कार्याचे कौतुक करणे स्वाभाविक ठरेल. दुकानातील दर आणि त्यांच्या विक्री केंद्रातील दर यात जवळजवळ सहा रुपयांचा फरक असतो. त्यामुळे त्यांच्या विक्री केंदाच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या समाजाकडून आपल्याला कळू लागते, त्यांचा उपक्रम हा किती लाभदायक आहे. ठराविक वस्तू त्याही दीपावली सणाला लागणाऱ्या पण त्यासाठी तोबा गर्दी उसळते. येथे फक्त गरीबच लाभ घेत नसतात तर सर्वधर्माचे मध्यमवर्ग देखील लाभ घेत असतात.

                                                *मुठीत माझ्या आभाळ*

                                                *मुठीत माझ्या माती*

                                                *आभाळ मातीचा*

                                                *आधारवड मी*

                                                *पारंबी –पारंबीशी नाती*

मनाला स्पर्श करणारे सुंदर विचार आपल्या वाणीतून समस्तावर बिंबवीत  समाजातील सर्व घटकांशी नाते असलेला कार्यकर्ता, ते करीत असलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करीत विभागपातळीवर केलेल्या कामाची दखल घेत राष्ट्रवादी पक्षाने त्यांना महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र या महामंडळाचे प्रतिनिधित्व बहाल केले होते,अशा व्यक्तीविषयी दोन शब्द लिहिणे हे आमचे भाग्य आहे. आता थोडेसेच लिहिले आहे. पण यथावकाश त्यांच्यावर अजून लिहायला नक्कीच आवडेल. वावटळीत सापडलेल्या आणि हतबल सर्वसामान्य लोकांच्या व्यथा ऐकून गलबलून जाणारा या आमच्या मित्राच्या हातून सदैव जनसेवा घडत राहो, या घोडपदेव समूहाकडून मनापासून शुभेच्छा.

 

*अशोक भेके*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट