कोपच्या

             कोपच्या


घेतले त्यांनी मला कोपच्यात....
लाजऱ्या पाकळ्या होत्या फक्त चार .... 
पाय झाले दगड, त्यांना फुललेले पाहून ....
हिरमुसलेल्या मजवर ....
एक कोपचा असा कि ,
मिळे हृदयाला आधार ....
एक कोपचा असा कि ,
मिळतील विचार ....
गर्दीत उमगले त्यांना सार ....
एक कोपचा असा कि,
नव्हता अंधार ......
उत्सुकता लागे मज ...
कधी मावळेल भास्कर ,
अन होईल अंधकार ....
भुणभुणारा मी भुंगा...
केवळ अमृतासंम मधूसाठी
मी धुंडाळले हे घर ....
दरवळे येथे सुवास
गार गार हवेत ...
घेउनी मजला कवेत ..

घेतले त्यांनी मला कोपच्यात

                                    अशोक भेके                   shailabheke@yahoo.com 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट